डीवायएसपी जायभायेंची अकार्यकारी पदावर नियुक्ती, वासुदेव मोरे निलंबित

अंबाजोगाई केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड दि.18 : अवैध धंद्यांची पाठराखण करणार्‍या अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे व नुकतेच नियंत्रण कक्षात संलग्न केलेले पोलीस निरीक्षक वासुदेव मोरेंना निलंबित करण्यात आले. तर अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.18) विधीमंडळ अधिवेशनात केली. या संदर्भात आ.नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी केली होती. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आ.नमिता मुंदडा यांनी विधानसभेत केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्याकडे देण्यात आला. तेव्हापासून या हद्दीत एकाही गैरप्रकारावर कारवाई करण्यात आलेली नाही. उलट अनेक वादग्रस्त घटना ठाणे हद्दीत घडलेल्या आहेत. या ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे. तसेच त्यांच्या उपनिरीक्षकाला नष्ट करण्यासाठी सांगितलेला गुटखा परस्पर विक्री केला आहे. याची कल्पनाही मोरेंना नाही असे होऊ शकत नाही. त्यांच्या आशीर्वादानेच पोलीसांनी हे धंदे करण्याचे धाडस केलेले आहे. तसेच मोरेंनी हद्दीत बनावट दारु कारखान्यावर कारवाई केली. त्यांना मुख्य आरोपी आढळून आला नाही, मुद्देमालही कमी सापडला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी दारुबंदी विभागाने त्याच कारखान्यावर छापा मारला त्यांना पुन्हा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल आढळून आला तसेच मुख्य आरोपीही सापडला. हे सर्व मोरेंच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचे दिसून येते. तसेच हे सर्व अवैध धंदे येथील उपअधीक्षक सुनिल जायभाये यांना माहिती आहे. मोरे आणि जायभाये यांच्या विचाराने हे सर्व चालत आहे. खुलेआम दारु विक्री, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे सुरु आहेत. माझ्यावर सुद्धा झालेल्या हल्ल्याची कसलीही चौकशी उपअधीक्षक जायभाये यांनी केलेली नाही. हा मोरे आणि जायभाये यांचा सुरु असलेला पॅटर्न बंद करायला हवा. त्यामुळे मोरेंना निलंबित करुन जायभाये यांच्यावरही कारवाई करावी. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोरेंनी कारवाई केल्यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा दारुबंदी विभागाने कारवाई केल्यावर अधिक मुद्देमाल आढळून येतो. यावरुन मोठा गैरप्रकार चालत आहे. अनेक गोष्टी संशयास्पद आहे. या प्रकरणात डिफाल्ट रिपोर्ट प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये केलेल्या कार्याबद्दल स्पष्ट नमुद केलेले असल्याने व याची चौकशी झाल्यामुळे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरेंना निलंबित केले जाईल. व पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभाये यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती केली जाईल. अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Tagged