varsha gaikwad

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई– कोरोनाच्या अनुषंगाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यापुर्वीच सरकारने स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव हा 15 ते 25 वयोगटात मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, सीबीएसी आणी आसीएईसह आयबी, केंब्रिज बोर्डाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसंच राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून दहावी बारावीच्या परीक्षा मे अखेरीस ते जून महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.


दहावीची परीक्षा जूनमध्ये घेतली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइनच होणार आहे. याआधी पहिली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच निर्णय घेण्यात आला होता.

Tagged