ऊसतोड कामगारांच्या ट्रकला माजलगावजवळ अपघात

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव तेलगाव रोडवरील लहामेवाडी फाट्यावरील घटना

माजलगाव – माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्या जवळ गुरुवार रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रक ने कर्नाटक कडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर माजलगाव बीड परभणी औरंगाबाद येथे उपचार चालू आहेत.

जालना जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आपल्या गावी जात असताना माजलगाव तेलगाव रोडवरील लहामेवाडी फाटा येथे गुरुवार रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातामध्ये वीस ते पंचवीस ऊसतोड कामगार जखमी झाले असून यात कविता संतोष राठोड विरगव्हाण मंठा, वर्षा बाळु राठोड हांडी जिंतुर, शालु शिवाजी चव्हाण विरगव्हाण मंठा, शरद लिंबा चव्हाण करणावळ मंठा, लक्ष्मी शरद चव्हाण करणावळ मंठा, या जखमीवर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर बाकीच्या जखमीवर बीड, औरंगाबाद, परभणी येथे उपचार चालू असल्याचे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय विजयसिंह झोनवाल यांनी सांगितले. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश खटकळ, नवनाथ गोरे ,उबाळे, पोटे, असेवार इत्यादी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

Tagged