ASHOK SHEJUL ATTACK

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणातील पाचवा आरोपी ताब्यात

न्यूज ऑफ द डे माजलगाव

बीड/माजलगाव
अशोक शेजुळ हल्ला प्रकरणातील फरार पाचवा आरोपी विजय शिवाजी पवार यास स्थानिक गुन्हे शाखा बीड च्या कर्मचाऱ्यांनी राजुरी परिसरातून काल रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

धुलीवंदन दिवशी शेजुळ यांच्यावर माजलगावमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्लात अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा. पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन करे (वय 26), शरद भगवान कांबळे (वय 29, सर्वजण रा. पुरूषोत्तमपुरी) यांना अटक करण्यात आली होती. तर विजय शिवाजी पवार हा आरोपी फरार झाला होता. पूर्वी अटक केलेल्या आरोपींनी आम्हाला विजय पवार याने हल्ला करण्यास सांगितले होते असे म्हटले आहे. आता विजय पवार अटक आहे त्यामुळे विजय पवार याच्या मागील मास्टर माईंड कोण हे पोलिसांना शोधावे लागणार आहेत. या प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके, मंगल प्रकाश सोळंके आणि रमदायाल टवाणी यांना माजलगाव न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला आहे.

Tagged