सलून, ब्युटी पार्लर चालकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन सूचना

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : हेअर सलून, स्पा व ब्युटी पार्लर चालू करणे संदर्भात निर्देश दिले असून खालील अटी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.

     आदेशात पुढे म्हटले की, हेअर कट, केसांना रंग लावणे, व्हॅक्सींग, थेड्रींग सारख्या सेवांना परवानगी असेल. त्वचेविषयीच्या सर्व सेवांना परवानगी नसेल. तसेच याबाबत संबंधित दुकानदार यांनी दुकानाबाहेर दर्शनी भागावर फलक लावावा. हेअर सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींनी/कर्मचारी यांनी मास्क ग्लोव्हाज, अॅप्रॉन एक परिधान करुन सेवा देणे बंधनकारक असेल. दुकानदार यांनी प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्या ग्राहकाची खुर्ची सॅनीटाईज करुन घ्यावी. तसेच दर दोन तासाला पूर्ण दुकान सॅनीटाईज करुन घ्यावे. दुकानदार यांनी एकदाच वापर करण्यायोग्य (Disposable) टॉवेल, नॅपकीनचा वापर करावा. वांरवार वापर कराव्या लागणाऱ्या साधनांचे प्रत्येक ग्राहकांच्या सेवेनंतर सॅनीटाईज किंवा निर्जंतुकीकरण करावे. हेअर सलून, स्पा, ब्यूटी पार्लर यांनी सदरील निर्देशांचे अनुपालन करणे संदर्भाने सर्व ग्राहकांना सूचना द्याव्यात. तसेच वरील सर्व निर्देशांचा फलक ग्राहकांच्या माहितीसाठी दर्शनी भागावर लावावा असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.

Tagged