rain

‘या’ दोन महसूल मंडळात अतिवृष्टी

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात गत 24 तासात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. आष्टी आणि केज तालुक्यातील नांदूरघाट या 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी 24 तासात एकूण 16 मि.मी.पावसाची नोंद पर्जन्यमापकावर नोंद झाली आहे. यात आष्टी महसूल मंडळात 76 तर केज तालुक्यातील नांदूरघाट महसूल मंडळात 70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेल्या पावसाची मि.मी.मध्ये आकडेवारी ः बीड-11.9, पाटोदा-4, आष्टी-36, गेवराई 27.01, शिरुर कासार-11, वडवणी-8, अंबाजोगाई 20.4, माजलगाव-5.7, केज-29.9, धारुर-14, परळी-11.8

Tagged