सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशामध्ये एकमत

देश विदेश न्यूज ऑफ द डे

पूर्व लडाख: देशाला चीन, पाकिस्तान या देशांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्याचसंबंधी काल रशियाकडून एस 400 हि यंत्रणा मिळवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियासाठी रवाना झाले. दोन्हीही देश युद्धाच्या तयारीत असताना,काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली.

या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य अधिकार्‍यांमध्ये एकमत झाले. गलवान खोर्‍यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा झाली. चांगल्या, सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली. लेफ्टनंट जनरल पदाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

मागच्यावेळी सहा जून रोजी लेफ्टनंट जनरल पदावरील लष्करी अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी सुद्धा तणाव कमी करण्यावर एकमत झाले होते. दोन्ही बाजूचे सैन्य हळू-हळू जात होते. पण 15 जून रोजी चीनने धोका दिला व पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ चौकी उभारण्याचा प्रत्यत्न केला. त्या रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. 1967 नंतर प्रथमच असा हिंसक संघर्ष झाला.

Tagged