sachin waze

स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडी चालकाची ओळख पटली!

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात महत्वाची माहिती पुढे येत आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीतून दोन्ही चालकांची नावे समोर आल्याचं सांगितलं जातं आहे. वाझे यांनी याबाबत खूप मोठा खुलासा करून या प्रकरणात एका बड्या अधिकाऱ्याचं नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण साधे राहिले नसून यातून सरकारला देखील हादरा बसू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान इनोव्हा गाडीची वारंवार नंबरप्लेट बदलल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं आहे. संशयाच्या घेऱ्यात असलेल्या नंबर प्लेटची इनोव्हा कार दोन वेळा मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून निघाली. ही महत्वाची घडामोड होत असताना इकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत काय होते हे रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. शिवाय इनोव्हा व स्कॉर्पिओ गाड्याच्या चालकांची ओळख देखील NIA जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात काही तास बैठक चालली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदललं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे हे खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण देशमुखांना बदललं जाणार की मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग हे मात्र निश्चित होऊ शकलं नाही. एनआयएचा तपास हा सरकारच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. त्यामुळेच वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांचीही विकेट पडू शकते अशीही चर्चा आहे. शेवटी सरकार राजकीय नेत्याचा बळी देणार की अधिकाऱ्याचा हे महत्वाचं आहे. पण जोरदार चर्चा आहे हे निश्चित.

Tagged