खंडाळा सोसायटीवर लाला चौरे, राजरतन जायभाये यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

न्यूज ऑफ द डे बीड

सर्वच उमेदवार वियजी

बीड : तालुक्यातील खंडाळा सेवा सहकारी सोसायटीच्या 10 जागांसाठी झालेल्या मतदान व निकालात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष लाला चौरे पाटील, युवा नेते राजरतन जायभाये नेतृत्वाखाली पॅनलचा दणदणीत विजय झाला. सर्वच्या सर्व 10 जागांवर मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत सर्व संचालकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हा व्हिडीओ नक्की पहा ….

Payal sadi beed

खंडाळा सेवा सोसायटीची निवडणूक बर्‍याच कालखंडानंतर पहिल्यांदा झाली या पुरवी हि निवडणून बिनविरोध होत होती. यावेळी निवडणूक झाली निवडणुकीपूर्वीच दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. महिला प्रवर्गातून दोन आणि सर्वसाधारण आणि इतरमधून 8 संचालकांच्या निवडीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. 73 सभासद असलेल्या या सोसायटी साठी 98 टक्के मतदान झाले. त्याच दिवशी 4 वाजता मतमोजणी झाली. या निकालात लाला पाटील चौरे आणि राजरतन जायभाये यांच्या पॅनलचे (कंसात मिळालेली मते) काकडे लींबाजी किसान (46 ), केकाण बजरंग तुळशीराम (44), केकाण लक्ष्मण खेमा (44), चौरे गुंडिबा साहेबराव (43), चौरे बळीराम करू (42 ), चौरे बाबासाहेब रामकृष्ण (43), चौरे लींबाजी विठ्ठल (42), जायभाये उत्तम भाऊराव (44 ), महिलामधून जायभाये यशोदा रंगनाथ (45 ), जायभाये सुजनाबाई चिंतामण (44) हे विजयी झाले तर विरोधी गटाच्या पॅनलला 22, 25 एवढ्याच मतावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.बी.जाधव यांनी काम पाहिले.

Tagged