लग्नाऐवजी अंत्यसंस्कार! मंडप उभारताना विजेचा धक्क्याने नवरीच्या वडीलांचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड वडवणी

वडवणी तालुक्यातील टोकेवाडीतील दुर्देवी घटना
वडवणी
दि.23ः मुलीच्या विवाहाची लगबग.. कुटूंबातील सर्वजण आपआपली कामे अटोपत होती. लग्नाचा मंडप उभारण्यासाठी नवरीचे वडील मदत करत होते. यावेळी दुर्देवाने मंडप उभारतांना विद्यूत तारेचा धक्का लागला अन् यामध्ये नवरीच्या वडीलांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तालुक्यातील टोकेवाडी येथे गुरुवारी (दि.22) रात्री उशीरा घडली. आज थाटात विवाह सोहळा संपन्न होणार होता, मात्र अंत्यविधी करण्याची वेळ कुटूंबीयांवर आली. या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केेली जात आहे.

वडवणी तालुक्यातील टोकेवाडी येथील हनुमंत अंबादास डोंगरे (वय 34) असे नवरी मुलीच्या पित्याचे नाव आहे. हनुमंत डोंगरे यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह हिवरापाडी येथील एका चांगल्या कुटुंबात ठरला होता. त्यानुसार शुक्रवारीच नवरदेवाला आणून नवरा-नवरीला हळद लावण्यात आली होती. अगदी लग्नाची जय्यत तयारी दोन्ही कुटुंबाकडून केली होती. रविवारी 24 एप्रिल रोजी दुपारी मुलीचा विवाह होणार होता, यासाठी जोरदार तयारी सुरू केली होती. सर्व कुटुंब व नातेवाईक एका आनंदाच्या डोहात बुडाले होते. परंतु काल या आनंदावर या दुर्दैवी घटना घडल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. विवाहाच्या मंडप उभारताना मंडपाला विद्युत तारेचा करंट लागल्यामुळे मंडपात लाखंडी अँगलच्या जवळ बसलेली व उभे राहिलेल्या सात ते आठ जणांना विजेचा धक्का बसला, यात काहीजण या धक्क्याने बाजूला फेकले गेले. मात्र नवरीच्या बापाला एवढा जबर धक्का बसला की ते जागीच मृत्यू पावले काही क्षणातच या लग्न सोहळ्यावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथे आणला असून शवविच्छेदन करण्यात आले. व मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.