acb office beed

एलसीबीकडे न पाठवण्यासाठी मागितली पन्नास हजारांची लाच!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

लाचखोर उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
बीड
दि.11 : दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता तहसिल कार्यालयात करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 40 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर बुधवारी (दि.11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल दिंगबरा सुर्यवंशी (वय 34 रा.कामखेडा.ता रेणापुर जि.लातुर) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सुर्यवंशी हे अंबाजोगाई शहर ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी तक्रारदार व त्याचा मित्र यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडे न करता अंबाजोगाई तहसील कार्यालयात करण्यासाठी 26 एप्रिल रोजी तक्रारदारास 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. बीड एसीबीने याची पंचासमक्ष खात्री करुन लाचेची मागणी केल्याप्रकरणी सुयर्वंशी यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अमंलदार सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

Tagged