bhaje- jilebi

भजे-जिलेबी तळा; पण तिथेच विकू नका तर घरपोहोच द्या

कोरोना अपडेट बीड

बीड- महाराष्ट्र शासनाने काल काढलेले आदेशात फक्त लॉकडाऊन हा शब्द हटवून त्या जागी निर्बंध घातले गेले आहेत. प्रशासनाच्या या निर्बंधांमुळे कोरोना संपण्यापुर्वी व्यापारी वर्ग मात्र संपलेला दिसेल असे भयावह चित्र आहे. प्रशासनाने कालच्या आदेशात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आपले स्टॉल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचवेळी हे पदार्थ तिथे आलेल्या ग्राहकांना खायला देण्यास बंदी घातली आहे. एकतर तयार केलेले पदार्थ ग्राहकांनी स्वतःच्या घरी घेऊन जावेत किंवा स्टॉलवाल्यांनीच घरपोहोच सुविधा द्यावी.


प्रशासनाच्या या आदेशाचे पालक करण्यासाठी कुठल्या स्टॉलवाल्यांकडे सुविधा आहेत? ते आणि जोडीला आणखी कुणीतरी असे दोघा तिघांवर चालणारा त्यांचा व्यवसाय आहे. अशा स्थितीत त्यांनी घरपोहोच सुविधा कशी द्यायची? प्रशासनाचा हा निर्णय अचंबित करणारा आहे. तुम्हाला दुकान उघडायला बंदी नाही मात्र तुम्ही दुकान उघडले की आम्हाला कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
काय म्हटले आहे प्रशासकीय आदेशात?

Tagged