corona vaccine

कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार!

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स स्थापन

दिल्ली: जगभरात कोरोना थैमान घालत आहे. त्यामुळे ही लस मिळवून ती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वसामान्यांपर्यंत हि लस पोहचावी म्हणून सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सरकारने वॅक्सीनची ओळख, खरेदी, वितरण आणि लसीकरणासाठी एका टास्क फोर्स स्थापन केली आहे.

या टास्क फोर्समध्ये मंत्रिमंडळ आणि संस्थांमधील प्रतिनिधीचा समावेश असणार आहे. देशातील 6 लस ह्या फेज 3 मध्ये तर काही संयुक्तपणे 2-3 टप्प्यात आहेत. त्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. आता सरकारनेही आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत.

या टास्क फोर्सचे नेतृत्व निती आयोगाचे डॉ. वीके पॉल करणार आहे तर सह-अध्यक्ष आरोग्य सचिव राजीव भूषण असणार आहेत. ही समिती भारतासाठी एकपेक्षा जास्त वॅक्सीनची खरेदी करणार आहे, ज्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असेल. सोबतच लसीकरणासाठीही प्लॅन तयार करण्यात येणार आहे.

रशियाचे रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. खास गोष्ट म्हणजे, वॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल अद्याप सुरु आहे.

या संदर्भातील बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनी दिलेली आहे.

Tagged