CORONA

बीडमध्ये अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 86 जण पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.8 : बीड शहरातील व्यापार्‍यांसाठी आयोजित केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट तपासणीत तब्बल 86 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या 86 जणांना तातडीने जागेवरच ताब्यात घेत उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.
यामध्ये बलभीम महाविद्यालयात केलेल्या तपासणीत 342 पैकी 11 पॉझिटिव्ह, मॉ वैष्णवी पॅलेस 396 पैकी 9 पॉझिटिव्ह, जिल्हा परिषद शाळा अशोकनगर येथे 384 पैकी 16 पॉझिटिव्ह, राजस्थानी विद्यालयात 551 पैकी 20 पॉझिटिव्ह, चंपावती प्रायमरी स्कूल बुथ 1 वर 455 पैकी 11 पॉझिटिव्ह, चंपावती बुथ क्र 2 वर 473 पैकी 19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1468 झाली आहे.

Tagged