बीड : कोरोनाचे द्विशतक…

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड : बीड जिल्ह्यात आज कोरोनाने द्विशतक ठोकले आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 203 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासनाने रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अहवाल जाहीर केला.
आज एकूण 3357 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात बीड शहरातील व्यापार्‍यांच्या केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 86 जण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तर रात्री उशीरा स्वारातिच्या प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून 117 जण कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची एकूण संख्या आता 1585 झालेली आहे. आजच्या अहवालात एकूण 3143 जणांचे नमुने निगेटिव्ह आढळले आहेत. तर 11 जणांचे अनिर्णीत होते. जिल्ह्यात आतापर्यंत 49 बाधीतांचा मृत्यू झालेला आहे. आज आढळून आलेल्यांमध्ये सर्वाधिक बीडमधील रुग्ण असून अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 86 तर स्वारातिच्या प्रयोगशाळेत 18 जण बाधीत आढळले. जिल्हा भरात पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये बहुतांश जणांना आपण कोणाच्या संपर्कात आलोत याची कसलीही माहिती नाही. त्यांच्यात लक्षणे नाहीत तरीही ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


पहा कुठे आढळले रुग्ण?

Tagged