महादेवाच्या मंदिरात युवकाची गळा चिरून हत्या ?

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

 चंद्रकांत अंबिलवादे : पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाला आठवडा उलटला नाही तोच गंगेश्वर महादेव मंदिरात एका 25 वर्षीय युवकाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. महादेवाच्या पिंडावर रक्ताचा अभिषेक घातल्याचे चित्र निर्माण झाले असून या घटनेने पैठण शहरात एकच खळबळ उडाली आहे. 
      पैठण शहरातील कहारवाडा येथील नंदू देविदास घुंगासे (वय 25) असे युवकाचे नाव आहे. गुरुवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात एका युवकाचे महादेवाच्या पिंडजवळ गळा चिरलेल्या व रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदरील मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल केला. तसेच घटनास्थळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पैठण शहरात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. महादेव मंदिरात सपोनि.सुदाम वारे यांच्या पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पैठण पोलिसाकडून सदरील खून पूर्ववैमनस्यातून झाला का ? याबाबत शोध सुरू आहे.

रुग्णालय परिसरात नातेवाईकांची गर्दी
घटनास्थळावरुन शवविच्छेदनासाठी मृतदेह पैठण रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठत त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती.


मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त
पैठण शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात ही घटना घडली. या ठिकाणी आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महादेवाच्या मंदिरात रक्ताचा सडा
सदरील युवकाची गळा चिरुन हत्या केल्यामुळे मंदिरामध्ये रक्ताचा सडा पडला होता. ही हत्या कशामुळे केली असा प्रश्न सर्वांना पडला असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tagged