माजलगावातील हिवरा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

बीड दि.11 : जुन्या वादातून दोन गट आमने-सामने आले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) दुपारी माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे घडली.
माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे शुक्रवारी दुपारी दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील लोक समोरासमोर आल्याने शाब्दीक चकमक होवुन काही वेळातच दोन्ही बाजुकडुन हाणमार सुरू झाली. सुंदर लक्ष्मण अवघडे, सर्जेराव लक्ष्मण अवघडे, विष्णु सुंदर अवघडे, ज्ञानेश्वर सुंदर अवघडे या चौघांसह महिलांना मारहाण करण्यात आली आहे. हे सर्वजण जखमी झाले असून त्यांना तातडीने माजलगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. माजलगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरील घटना ही जुन्या वादातून घडली असल्याची माहिती आहे.

Tagged