grampanchayat

ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

न्यूज ऑफ द डे राजकारण

मुंबई- मुदत संपलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. त्यावरूनही राजकारण पेटले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बर्‍याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Tagged