बीड-आरोग्य विभागाच्या परिक्षेत गैरव्यवहार करणारा बीडचा संजय शाहुराव सानप (वय 40 रा. वडझरी ता. पाटोदा) यास पुणे सायबर पोलीसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. आज त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पुणे सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याच्या घरी धाड मारल्यानंतर पोलीसांना तब्बल दोन कोटी रुपयांचे घबाड आढळून आले. त्याच बरोबर आरोग्य सेवा गट ड परिक्षेत गैरव्यवहार करण्याात आल्याच्या आरोपात संजय शाहूराव सानप याचाही सहभाग आढळून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. यापुर्वी बीडच्याा अनेकांना यात अटक झालेली आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील वडझरी पॅटर्नची पोलखोल होण्यास सुरुवात झाली आहे. फसवणूक झालेल्या उमेदवारांनी पुणे सायबर विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.