फारूक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा

न्यूज ऑफ द डे बीड


बीड : ६ वर्षांपूर्वीच्या एका वनपालाला झालेल्या मारहाण प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक फारूक पटेल यांच्यासह एकाला बीडच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
बीड येथील वनविभागाच्या कार्यालयात २०१५ मध्ये फारूक पटेल यांनी नियंत्रण कक्षाचे कुलूप तोडून भिंत पाडली आणि तत्कालीन वनपाल सखाराम कदम यांना मारहाण केल्याचा गुन्हा बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात शहर पोलिसांनी बीडच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायालयासमोर दोषारोप पत्र दाखल केले होते. यात न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने फारूक पटेल यांच्यासह जाकिरोद्दीन सिद्दकी यांना २ वर्ष शिक्षा आणि दिड हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Tagged