arrested criminal corona positive

बाथरुममध्ये दारुचा साठा!

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

एक लाखाची दारु पकडली
बीड
दि.11 : घरासमोर असलेल्या बाथरुममध्ये एका तरुणाने देशी विदेशी दारुचा साठा करुन ठेवला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्या ठिकाणी छापा मारत एक लाखाची दारु जप्त केली. तसेच आरोपीवर पाटोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

राजु चामदेव खाडे (रा.करजवन ता.पाटोदा) असे आरोपीचे नाव आहे. राजु याने आपल्या घरासमोरील बाथरुममध्ये देशीविदेशी दारुचा साठा केला होता. स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.11) छापा मारला असता एक लाख 6 हजार रुपयांची दारु आढळून आली. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि. भारत राऊत यांच्या टिमने केली.

Tagged