एआरटीओ कार्यालयातील प्रकार; बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल
बीड दि.17 : येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील लिपकास एकाने वाहनाच्या कागदपत्रावर खोट्या स्वाक्षर्या केल्या. सदरील बाब येथील लिपीकाच्या निदर्शनास आल्यानंतर काम होणार नाही असे सांगितले. त्यावर लिपिकास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील लिपीक विक्रमसिंग राजपूत हे त्यांच्या सहकार्यासोबत आस्थापना शाखेत काम करत होते. यावेळी काम सुरु असलेल्या खिडकीजवळ असलम सय्यद हा एका दुचाकीचे (क्र.एमएच 23 एव्ही 1543) कागदपत्र घेऊन आला. वाहन हस्तांतरण करायचे असल्याचे सांगितले. दरम्यान, त्या कागदपत्रावर अधिकार्यांच्या खोट्या स्वाक्षर्या असल्याचे निदर्शनास आले. या खोट्या स्वाक्षर्या असल्याने काम होणार नाही असे सांगितल्याने असलम सय्यद याने विक्रमसिंग राजपूत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच राजपूत हे पोलीस ठाण्यात खोट्या स्वाक्षरीचे कागपत्र घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी जात असताना, आरोपीचे साथीदार शेख अमीर शेख रिजवान, शेख अदनान शेख रिजवान यांनी कागपत्रे वापस दिले नाही तर, जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.