khun

केजमध्ये दोन गटात दगडफेक; 60 संशयित पोलीसांच्या ताब्यात!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

केशव कदम | बीड

दि. 24 : केज शहरात क्षूल्लक कारणावरून दोन गट आमने-सामने येत दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल 60 तरुणांना ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ व पूर्ण टीमने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटातील तब्बल 65 गुन्हा दाखल केला आहे. सध्या शांततेचे वातावरण असून कुणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केज शहरात शुक्रवारी (दि.24) मध्यरात्री दोन गटात किरकोळ वाद झाला. दोन गट आमने-सामने आल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये 30 ते 40 जण किरकोळ जखमी झाले आहेत. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही केजकडे धाव घेतली. स्वतः पोलिसांनी फिर्यादी होत 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला असून 60 तरुणांना ताब्यातही घेतले आहे. सध्या पूर्ण शांतता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. तसेच शांतता राखावी, कुणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असेही ठाकूर यांनी आवाहन केले आहे.

Tagged