पिंपळनेर हद्दीमध्ये एलसीबीने 52 लाखांचा गुटखा पकडला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

दोघे ताब्यात; चौघांवर गुन्हा दाखल
बीड
दि.21 : तालुक्यातील घोडका राजुरी परिसरात एका पत्र्याच्या गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाली. मंगळवारी (दि.21) पहाटेच्या सुमारास छापा मारत तब्बल 52 लाखांचा गुटखा व एक स्कार्पिओ जप्त केली आहे. यावेळी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून दोघे मात्र फरार झाले आहेत. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महारुद्र उर्फ आबा मुळे, सत्यप्रेम घुमरे, बाळासाहेब वरेकर, रौफ शेख यांच्यावर या गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील घोडका राजुरी परिसरात पत्र्याच्या गोदामात गुटख्याचा साठा करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला असता 52 लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. तसेच एक स्कार्पिओ जप्त करण्यात आली आहे. यावेळी पोलीसांनी महारुद्र मुळे, सत्यप्रेम घुमरे यांना ताब्यात घेतले असून बाळासाहेब वरेकर व रौफ शेख हे दोघे फरार झाले आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पोह.मुन्ना वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, विकास वाघमारे, नारायण कोरडे, चालक अतुल हराळे, अशोक कदम आदींनी केली आहे. या कारवाईने गुटखा माफियात खळबळ माजली आहे.

Tagged