पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त मिळाला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र


सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली; सचिन पांडकर बीडचे नवे एएसपी
बीड दि.7 ः राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधीकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.7) समोर आले. यामध्ये बीड येथील पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली झाली आहे तर बीडचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्कचे अधीक्षक सचिन पांडकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस दलात मोठ्याप्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. शासनाने भापोसे आणि महाराष्ट्र पोलीस केडरमधील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. बीड येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यदक्ष कामगिरी करणारे सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली करण्यात आली. तर राज्य मानवी हक्क आयोगात अधीक्षक असलेले सचिन सुरेश पांडकर यांची बीडचे अपर अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील 109 अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर उप आयुुक्त म्हणून अनिल पारसकर, दीक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती तर भाग्यश्री नवटक्के यांची राज्य राखीव पोलीस बल चंद्रपूर येथे समादेशक म्हणून तर संभाजी कदम अमरावतीचे पोलीस उपा आयुक्त, विजय कबाडे वर्धा अपर पोलीस अधीक्षक व औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून संदीप आटोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tagged