बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता….

न्यूज ऑफ द डे बीड

राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

बीड : जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका कधी लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. अखेर आज (दि.11) निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. त्याचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यातील सुमारे 704 ग्रामपंचायतचा समावेश आहे.

Tagged