भीषण अपघातात चौघांचा मृत्यू; एक गंभीर

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


गेवराई : भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या टँकरला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपासवर गुरुवारी (दि.26) सकाळी घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व सुभाष भिंगे, व्यंकट सकटे, सदाशिव गर्दे, राम भिंगे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कारने लातूराहुन औरंगाबादला जात होते. गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे त्यांच्या चालकाचा ताबा गाडीवरून सुटला आणि समोरून येणाऱ्या इंडीयन ऑईलच्या कंन्टेनरला जोराची धडक बसली. यामध्ये जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व सुभाष भिंगे यांचा जागीच मृत्यू झाला तर व्यंकट सकटे, सदाशिव गर्दे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वंचित अघाडीचे प्रा.शिवराज बांगर यांनी दिली. घटनास्थळी महामार्ग पोलीस सपोनि. प्रविणकुमार बांगर, पोउपनि.घोळवे, पोह.कल्याण तांदळे, संदीप बांगर, अजय जाधव, राजेंद्र राख, दासू भोकरे यांनी जखमींना रुग्णालयात पाठवून वाहतूक कोंडी सुरळीत केली.

Tagged