जमीनीच्या चार काकर्‍या जास्त खातो म्हणून भावाला मारहाण!

क्राईम परळी


सिरसाळा ठाण्यात तीन भावांवर गुन्हा
बीड
दि.15 ः आमच्या जमीनीच्या चार काकर्‍या जास्त खातोस असे म्हणत भावासह भावजईला तिघा भावांनी मारहाण केल्याची घटना परळी तालुक्यातील पाडोळी येथे घडली. या प्रकरणी तिघांवर सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशीकला अशोक हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बळीराम बाबासाहेब हजारे, तुकाराम बाबासाहेब हजारे, विकास बाबासाहेब हजारे यांनी पती अशोक हजारे यांना आमच्या जमीनीच्या चार काकर्‍या जास्त खातोस म्हणत, बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सिरसाळा पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Tagged