HATKADI

दारुड्या पतीचा मुलाच्या मदतीने पत्नीने केला खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


पिंपरगव्हण येथील खूनाचा बीड ग्रामीण पोलीसांनी केला उलगडा
केशव कदम-बीड

दि.14 : BEED सतत दारु पिवून मारहाण करत पती त्रास देत होता. त्यामुळे मुलाच्या मदतीने पत्नीने त्यास मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारासाठी म्हणून दवाखान्यात घेवून निघाले. परंतू वाटेत मनात वाईट विचार आल्याने दोरीने गळा आवळून खून करत प्रेत रस्त्यावरच टाकून दिले. बीड ग्रामीण पोलीसांनी (beed gramin police) अवघ्या तीन ते चार दिवसात या प्रकरणाचा उलगडा करत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. (Wife killed her husband with the help of her son!)

भागवत आश्रुबा नगदे (वय 60 रा.तांदळवाडी भिल्ल ता.बीड) असे मयताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसर भागवत यांचा मृतदेह शहरातील पिंपरगव्हण येथे मृतावस्थेत आढळून आला होता. बीड ग्रामीण पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छदनासाठी रुग्णालयात दाखल केला. अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक पद्धतीने तपास केल्यानंतर या प्रकरणात कुटूंबातीलच सदस्यांचा हात असल्याचा पोलीसांना संशय आला. या प्रकरणी पत्नी देवशाला भागवत नगदे (वय 55), विनोद भागवत नगदे (वय 28 दोन्ही रा.तांदळवाडी भिल्ल ता.बीड) यांना ताब्यात घेवून चौकशी केली. यावर त्यांनी दारु पिवून सतत त्रास देत असल्यामुळे खून केल्याची कबुली दिली. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीणचे निरीक्षक संतोष साबळे, सहायक निरीक्षक वैभव रणखांब, उपनिरीक्षक देविदास आवारे, सुनिल अलगट, अंकुश वरपे, अतिष मोराळे, सतीश मुंडे, गणेश कांदे यांचा सहभाग होता.

Tagged