बीड दि.8 ः नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून बुधवारी (दि.8) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती गृहविभागाच्या आदेशाने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या बदलीनंतर प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. महिन्यापेक्षा अधिक काळ त्यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सांभाळला. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात अनेक घटना घडल्यामात्र त्यामध्ये उत्कृष्ट पद्धातीने त्यांनी त्या हाताळल्या. तसेच पोलीस कर्मचार्यांच्या प्रशासकिय बदल्याही समाधानकारक झाल्या. आता बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आदेश गृहविभागाने काढले आहेत.
Related