sushil solanke

विरोधकांकडून राजकारण -सुशील सोळंके

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगावः शेतकर्‍यांच्या पीक कर्जाची प्रकरणात बँकेकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. पीक कर्ज प्रकरणात जागेवर निपटारा व्हावा म्हणून आ.प्रकाश सोळंके यांनी उपस्थित राहून अधिकार्‍यांना सुचना केल्या. या ठिकाणी संपूर्णपणे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले होते. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क होता. परंतु विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी केला आहे.

माजलगावचे आ.प्रकाश सोळंके यांनी आज तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्जाच्या प्रश्नावर बँकेच्या अधिकार्‍यांसोबत गावात बैठक घेतली. या बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष अरूण राऊत यांनी आक्षेप घेत सोशल डिस्टंन्सिंगचा मुद्दा करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुशील सोळंके यांनी सादोळ्यात झालेल्या या बैठकीसंबंधी आपली भुमिका स्पष्ट केली.

Tagged