बीड दि. 8 : गर्भपात प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाला, यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील आरोपी सीमा सिस्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
सीमा सुरेश डोंगरे (वय 45 रा.शिक्षक कॉलनी बीड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह बुधवारी सकाळी बिंदुसरा धरणामध्ये मृतावस्थेत आढळून आला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, गणेश कांदे यांनी घटनस्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदरील महिला ही गर्भपात प्रकरणातील आरोपी असून या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे.