किराणा दुकानातून ४ लाखांचा गुटखा जप्त

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

परळीत आयपीएस पंकज कुमावत पथकाची कारवाई

परळी : आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी शहरातील अमर ग्राउंडवरील किराणा दुकानावर सोमवारी सायंकाळी छापा मारला. यात ४ लाख ४० हजार ४६५ रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. तर तिघे फरार झाले आहेत.

जयंत रघुनाथ लोकरे (वय ४८, रा.अमर ग्राउंड), आनंद मुंजाजी फल्ले (वय ४२, रा. गंगासागर नगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अल्ताफ पठाण, फिरोज शेख, गफार खान (सर्व रा.परळी) ते तिघे फरार आहेत. राज्यात गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला. दुकानातून विविध प्रकारचा ४ लाख ४० हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळे करत आहे…..

Advt

ही कारवाई आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, राजू वंजारे, सचिन अहंकारे, संजय टुले, शिवाजी कागदे आदींनी केली. या कारवाईमुळे गुटखामाफियामध्ये खळबळ उडाली आहे.

Tagged