ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है; ‛जिद्दारी’ चित्रपट प्रदर्शित होणार

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाईत पोस्टर लॉंचिंगला प्रतिसाद

अंबाजोगाई : शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा, ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण आणि एक उत्कट प्रेमकथा यांचा त्रिवेणी संगम असलेला हा मराठी चित्रपट येत्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक अमोल शिंदे होळकर यांनी दिली. अंबाजोगाईत चित्रपटाचे पोस्टर, गाणे प्रदर्शन सोमवारी (दि.14) पार पडले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रा.काँ.चे युवा नेते तानाजी देशमुख, मानवलोकच्या अरूंधती पाटील, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.अरूणा केंद्रे, मंदाकिनी गित्ते, सोनाली चव्हाण, अ‍ॅड.पद्मा कुपकर, अभिजीत गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केज तालुक्यातील होळचे भुमिपूत्र असलेले दिग्दर्शक अमोल शिंदे होळकर यांच्यासह कलाकरांचा स्थानिक नागरिकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. अमोल शिंदे होळकर म्हणाले, ‘जिद्दारी’ म्हणजे जिद्द. हा चित्रपट शेतकर्‍यांच्या समस्यांवर भाष्य करत असला तरी त्यामध्ये महिला सबलीकरण आणि एक सुंदर अशी प्रेमकथा सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात विदुला बाविस्कर, शुभम तारे, विजय अंजान, रवींद्र सोळंके, रवींद्र ढगे, सुधीर माले, राजश्री पठारे, जयश्री सोनवणे यांच्या भूमिका आहेत. ए.आर. माइंडस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जिद्दारी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती दीप्ती जाधव शेंदारकर यांची आहे. ‘जिद्दारी’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न मांडणारा हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटास प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अमोल शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी भीमसेन लोमटे, योगेश पोखरकर, उत्तरेश्वर खाडे, राम कदम, ज्ञानेश्वर शिंदे, सोनू शिंदे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर पाहून पिक्चर अभी बाकी है अशा आपसूकच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Tagged