होळच्या वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन

केज न्यूज ऑफ द डे

वीज प्रश्नी ‛स्वाभिमानी’ आक्रमक

केज : तालुक्यातील होळ येथील महावितरण कंपनीच्या विद्युत उपकेंद्र अंतर्गत गावातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्वसूचना न देताच तोडले जात आहेत. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून होळीच्या विद्युत उपकेंद्रावर आज (दि.१५) सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप कर्पे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, महावितरण कंपनीने कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता खंडित केलेला वीजपुरवठा दोन दिवसात पूर्ववत करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना परस्पर वीज जोडणी करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युसूफवडगाव पोलिसांचा बंदोबस्त होता. दरम्यान, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता पेन्सिलवार, मंडळ अधिकारी सुनील तांबारे, पोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन शेख यांनी निवेदन स्वीकारले. २ दिवसांत परस्पर वीज जोडणी करण्याचा इशारा कुलदीप करपे यांनी दिला आहे.

Tagged