केजमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह अकरा जणांवर गुन्हा

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

‘डीएम’चा आदेश मोडणे अंगलट

केज : बीडच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या (district magistrate) आदेशाचे उल्लंघन करत गैरकायद्याचा जमाव करणे शहरातील नगरपंचायतच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना चांगलेच अंगलट आले आहे. सोमवारी (दि.१४) नगरपंचायतच्या निवडी झाल्या आणि पदभार घेण्यापूर्वीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह ११ जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीडच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी गर्दी न करण्याबाबत दिलेल्या आदेशाची आवाज्ञा करून केज शहरातील मंगळवार पेठ ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत गैरकायद्याचा जमाव करून १०० ते १५० लोकांना एकत्र आणले. व विजयी मिरवणूक काढली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करत आहेत.

ही आहेत ११ आरोपींची नावे
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिता प्रदीप बनसोड, उपनगराध्यक्ष शितल पशुपतीनाथ दांगट, जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारून चाँदपाशा इनामदार, जेष्ठ नेते अंकुश इंगळे, नगरसेवक आदित्य अशोकराव पाटील, पशुपतीनाथ दांगट, नगरसेवक सोमनाथ गुंड, सुग्रीव माणिक कराड, नगरसेविका पल्लवी ओमप्रकाश रांजनकर, नगरसेविका पदमीन गुलाब शिंदे, शकील ईनामदार अशी आरोपींची नावे आहेत.

Tagged