AMBULANCE

रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे चालकाला मारहाण करत अ‍ॅम्बूलन्स फोडली

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड  :  रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी अ‍ॅम्बुलन्स चालकाला मारहाण करत अ‍ॅम्बूलन्सचीही तोडफोड केली आहे. ही घटना बीड शहरातील संजिवनी हॉस्पिटल येथे शनिवारी (दि.29) दुपारच्या सुमारास घडली 

कृष्णा धांडे असे अ‍ॅम्बूलन्स चालकाचे नाव आहे. तो शहरातील दिप हॉस्पिटल समोर अ‍ॅम्बुलन्समध्ये (एमएच-23, 5998) बसलेला होता. यावेळी काही तरुण दुचाकीवर आले व गांधीनगर परिसरामध्ये एक पेशंट असून त्यास रुग्णालयात आणायचे आहे असे सांगून सोबत घेवून गेले. त्यानंतर रुग्णाला अ‍ॅम्बुलन्समधून संजिवनी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले. ऑक्सिजन कमी पडल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकास सांगितले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी अ‍ॅम्बूलन्स चालकाची चुक काढत त्याला मारहाण केली. तसेच गाडीच्याही काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसात धांडे यांनी तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged