मुंबई, दि.15 : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून भाजपा आणि किरिट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. किरिट सोमय्यांना त्यांनी थेट दलाल आणि भडवा असे संबोधीत करीत अनेक आरोप केले. त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना विरूध्द भाजपा असा वाद सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. राऊत म्हणाले, नामर्दाप्रमाणे आमच्यावर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. अनिल परब, आनंदराव अडसूळ यांच्यासारख्या आमच्या नेत्यावर कारवाई करत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गौरवापर सुरू आहे. खोटे आरोप केले जातात किंवा बदनाम केलं जातं. तुम्ही सरंडर व्हा नाहीतर कारवाई होईल असा दबाव टाकला जातो. बहुमत असताना भाजप नेते सरकार पाडण्याच्या तारखा का देतात?
पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे…
– 4 वाजून 7 मिनिटांनी पत्रकार परिषद सुरु
– आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद
– अनेक लढे शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही येथून सुरु केले आहेत. नुसते हल्ले नव्हे तर अतिरेकी हल्ले पचवले आहेत.
– आप आगे बढो असा अशीर्वाद सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी मला दिला आहे.
– तुम्ही काही केलं नसेल तुमचं मन साफ असेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका.
– आम्हाला संदेश द्यायचाय की महाराष्ट्र गांडुची अवलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही.
– निबल परब, भावना गवळी, पवार कुटुंबिय या सगळ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पध्दतीने हल्ला करतेय. पश्चिम बंगालवर देखील असेच हल्ले सुरु आहेत.
– खोटे आरोप, बदनाम्या, एकतर तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका, अन्यथा आम्ही तुमचे सरकार घालवू.
– भाजपाने 10 मार्च ही तारीख दिली सरकार घालवण्याची.
– व्यंकय्या नायडू यांना मी एक पत्र लिहीलंय.
– भाजपचे काही प्रमुख लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी मला वारंवार सांगितले तुम्ही या सरकारच्या प्रवाहामधून बाहेर पडा. आम्ही सरकार घालवू तुम्ही आम्हाला मदत करा. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत.
– केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील. दिल्लीतून तशी सगळी तयारी झाली आहे.
– पवार कुटुंबियांवर धाडी पडू लागल्यात. ईडीचे लोक पवारांच्या बहीणीच्या घरात आठ आठ दिवस थांबून होते.
– केंद्रीय पोलीस आणून आणि सगळ्यांना थंड करू. तिसर्या दिवशी माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली.
– तुमचं सरकार महाराष्ट्रात आलं नाही म्हणून तुम्ही असं ईडी लावून आम्हाला झुकवायला लावता पण हे शक्य होणार नाही. मी ज्या ज्या दिवशी त्यांना नकार देत गेलो त्या त्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना टार्गेट करायला सुरुवात केली.
– शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ले सुरु
आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेण्याची आमची योजना होती. परंतु आम्ही सुरुवात आता इथं करू आणि आम्ही शेवट तिथं करू
– मुलंडचा दलाल पत्रकार परिषद त्याला मराठी भाषेत भडवा म्हणतात.
– तो म्हणतो की ठाकरे कुटुंबियांनी कोरला गावात 19 बंगले बांधून ठेवलेत. माझं आव्हान आहे त्या दलालाला. आपण चार बसेस करू आणि पिकनिक करू. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर राजकारण सोडून देईल आणि नाही दिसले तर त्या भडव्याला जोड्याने मारू.
– लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. हा किरीट सोमय्याने हायकोर्टात पीटीशन केलं होतं. मराठी भाषा सक्तीची करू नये असं कोर्टात गेलेला हाच तो भडवा दलाल मराठी भाषेचं कट्टा चालवतो. याचं थोबाड बंद करा नाहीतर आम्ही ते बंद करू.
– आम्ही देवस्थानच्या जमीनी विकत घेतल्या असं म्हणत आहेत पाटणकर. ती जमीन आम्ही कुठे आणि कशी विकत घेतली हे त्यांनी दाखवावं.
– आनंदराव आडसूळ वारंवार सांगत आहेत मी निर्दोष आहे तरीही त्यांच्याविरोधात बोललं जातंय. अनिल परब, रविंद्र वायकर, भावना गवळी, यांच्या विरोधात बोललं जातंय.
– माझ्या बँकेतून 20 वर्षाचे स्टेटमेंट त्यांनी नेले आहे.
– माझ्या गावाकडे मी 50 गुंठे जमीन आहे तिचा तपास ईडी करतेय.
– पहाटे पहाटे ही ईडी त्या गावात घुसतेय. आणि लोकांवर दबाव टाकत माझ्याविरोधात लिहून दे म्हणत त्यांच्यावर दबाव टाकत आहेत.
– तिहारच्या जेलमध्ये टाकू म्हणून धमक्या दिल्या जात आहेत.
– माझ्या मुलीच्या लग्नाच्या हिशोबाला ते गेले. मेहंदी लावणार्यांकडे देखील ते गेले.
– गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा घोटाळा झाला दोन वर्षात साधा एफआयआर देखील केला नव्हता.
– भाजपच्या एका वनमंत्र्याच्या मुलीच्या लग्नात जंगलाचा फिल येणारा साडेनऊ कोटीचा सेट उभा केला.
– बघा, बघूनच घ्या. मी जेलमध्ये जाईल पण तुम्हाला देखील घेऊन जाईल.
– माझ्या मुलंडच्या टेलर कडे जाऊन देखील त्यांनी चौकशी केली. कितीचे कपडे शिवले असे त्याला विचारत होते.
– त्यांना कुठे जायचे ते जाऊद्या त्यांना टक्कर शिवसेनेशी द्यायची आहे.
– एक दूधवाला नरवर सात हजार करोड चा मालक कसा झाला? मुख्यमंत्र्याच्या घरी त्याचं घरी येणं जाणं होतं.
– सात हजार करोड मधून साडेतील कोटी करोड महाराष्ट्रातून गेले आहेत.
– महाआयटीमध्ये सर्वात मोठा घोटाळा. 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा
– कोण आहे अमोल काळे?
सगळ्यांचे अकाऊंट, काढा. बिनाटेंडरचे पैसे कुणाकडे गेले.
– आमची एक गुंठा जमीन काढा, मी तुमचे 25 हजार कोटीचे घोटाळे काढतो.
– आपने गलत आदमीसे पंगा लिया है. आपने महाराष्ट्रसे पंगा लिया है.
– पीएमसी बँक घोटाळा आणि पत्राचाळचा घोटाळा आमचा काढला परंतु ही बँक कुठे आहे तीच मला माहिती नाही. माझ्या मित्रांची खाती त्यात असतील परंतु मी त्यांना आजही मित्रच म्हणतो मी पळपुटा नाही.
– राकेश वाधवान हा आरोपी पीएमसी घोटाळ्यात आहे असे ते सांगत आमचा संबंध त्याच्याशी जोडतायत. राकेश वाधवानला त्या काळात
– बीजेपी च्या अकाऊंटला 20 कोटी रूपये राकेश वाधवानच्या अकाऊंटमधून गेले.
– ईडी, सीबीआय, प्रधानमंत्री, गृहमंत्री इकडे लक्ष देऊन ऐका.
– निकॉन ईन्फ्रस्टकस्ट्रकशन कंपनी किसकी है ही कंपनी किरिट सोमय्या ची आहे आणि ते राकेश वाधवानचे पार्टनर आहेत.
वसईत त्यांनी मोठा प्रकल्प उभा केलाय या पीएमसी बँकेतील पैशाने.
– लाडानी या माणसाकडून किरिटने ब्लॅकमेल करून 100 कोटी रुपयांच्या पुढे रोख रक्कम घेतली.
– 400 कोटीची जमीन फक्त साडेचार कोटी रुपयांना घेतली. अशा दोन जमीनी त्यांनी घेतल्या. त्या कंपनीचा डायरेक्टर किरिट सोमय्या आहे. आणि हा सगळा पैसा किरिट सोमय्यांनी घेतला.
– आदीत्य ठाकरे यांन अवाहन आहे या प्रोजेक्टचे सर्व परवाने रद्द करा आणि त्यांना ताबडतोब अटक करा.
– पीएमसी घोटाळ्यापुर्वी किरिटच्या अनेक जवळच्या लोकांनी पैसे काढून घेतले.
– भ्रष्टाचाराविरोधात लढणारा हा माणूस आम्हाला अक्कल शिकवतोय.
– किरिट सोमय्या देवेंद्र रजनीकांत याने राकेश वाधवानशी व्यवहार केलाय.
– हे सगळे पेपर्स मी तीनवेळा ईडीकडे पाठवले. पण ते एक गुंठ्या वाल्याला बोलवलं. आणि हा किरिट सोमय्या ईडीमध्ये बसून दही खिचडी खात बसतो.
– ईडीचे सगळे लोक वसुली एजंट बनले आहेत.
– आता ईडीच्या लोकांनी माझ्या घरी यावं.
– जितेंद्र चंदलाल नवलानी कोण आहे?
– आता हे नाव ऐकूनच दिल्लीच्या लोकांना घाम फुटला असेल.
– मुंबईच्या प्रतिष्ठीत 70 बिल्डरांकडून सगळी वसुली करणं काम सुरु आहे.
– मोदी, अमित शहांना ही माहिती देणार आहे.
– जितेंद्र नवलानी, रोमी, फरिद शमा हे कोण आहेत.
काय अय्याशी करतात हे मी देशाला सांगणार आहे. तुम्ही मला गोळी मारा मी तुम्हाला घाबरणारा नाही.
– महाराष्ट्र, बंगाल चे सरकार पाडण्यासाठी ईडी आणि सीबीआयला हत्यार बनवले आहे.
– एैसी कोई जेल बनी नही जो मुझे दोन साल तक रख नही जाती.
– मोदी आणि अमित शहा यांची हीच लोकशाही आहे का?
– तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर माझ्याशी लढा माझ्या मुलाबाळांशी का? माझ्या जवळच्या लोकांना का त्रास देतायत?
– हम डरेंगे नाही झुकेंगे नही, 2024 ला देशात परिवर्तन होईल.
– ये खाली ट्रेलर है, पुन्ह काही व्हीडिओ आणि काही डॉक्यूमेंट पुढे येतील. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर कुठेही जा जो बायडेनकडे जा काही
मोहीत कंबोज फ्रंट चेहरा तो फडणवीस यांना डुबवणार आहे.
– पत्राचाळ येथील जमीन खरेदी करणारा पीएमसी बँकेचा पैसा वापरला.
– राकेश वाधवान कडून 12 हजार करोडची जमीन मोहित कंबोजने खरेदी केली. केवळ 100 कोटी रुपयांत.
– केबीसी काळ भैरव सोल्युशन,
हा पैसा कुठून आणि कसा आला हे फक्त फडणवीस यांनाच माहिती असणार आहे.
– साडेतीन लोकांबद्दल उद्या सांगेल, असे म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेचा समारोप केला.