CHEDCHHAD, ASHLIL CHALE, VINAYBHANG

विकृती : प्रातःविधीसाठी जाणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत अश्ल्लिल चाळे

क्राईम न्यूज ऑफ द डे वडवणी

उपळी गावातील तीन नराधमांचा कृत्य

वडवणी दि.16 : नराधमांनी सध्या मोठाच उच्छाद मांडला आहे. दोनच दिवसापुर्वी पाटोदा येथे तलावावर गेलेल्या एकट्या महिलेला गाठून अत्याचाराची घटना घडली असताना आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथेही नराधमांची विकृती उफाळून आली. येथे प्रातःविधीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला तिघा नराधमांनी अडवून जवळच असलेल्या विटभट्टीच्या खोलीत नेले आणि तिथे तिच्यासोबत अश्ल्लिलचाळे केले. या चाळ्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला दिली. मात्र पीडितेने घडला प्रकार घरी येऊन आईला सांगितला. त्यानंतर आईने वडवणी ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

राजेश उद्धव नाटकर, नामदेव केरबा आगवाणे, दीपक बापुराव माळी, सर्व राहणार उपळी अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवणी तालुक्यातील उपळी येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचाला जात होती. गावातील तीन युवकांनी तिला रस्त्यात अडवून शाळेजवळील वीट भट्टीच्या रूममध्ये तिला जबरदस्ती नेले. आणि तिथे तिच्याशी अश्लिल चाळे करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कुणाला सांगितलीस तर तुझे मोबाईलमध्ये अश्लिल चाळे करतानांचे सेल्फी फोटो काढलेले सगळ्यांना दाखवेल, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. पीडित मुलगी या नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर तिने मोठी हिम्मत करत घरी येऊन सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. आईने तात्काळ वडवणी पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. पोलीसांनी त्यावरून फिर्याद दाखल करीत वरील सर्व आरोपीविरोधात कलम 354, 506, 34 भा.दं.वि.सह कलम 8, 12 पोक्सो 2012 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय महेश टाक हे करत आहेत.

Tagged