CHHAL, MARHAN, GHARATUN HAKLUN DENE

चार लाखासाठी विवाहितेचा छळ; पती, सासू, सासर्‍यासह सहा जणांवर गुन्हा

केज कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

केज, दि.16 : प्लॉट खरेदीसाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, सासू, सासरा आणि अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यतील सरोज हिचे लग्न एक वर्षांपूर्वी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ता. यावल येथील इरफान युसूफ मोमीन याच्याशी झाले होते. सरोज हिला लग्न झाल्यापासून एक महिना चांगले नांदवले; परंतु त्यानंतर वेगवेगळ्या कारणावरुन सासरचे लोक तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. तिला प्लॉट खरेदीसाठी माहेरहून चार लाख रु. घेऊन ये, म्हणून तिला मारहाण करीत असत. तसेच तिला उपाशीपोटी ठेवून शारीरिक आणि मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी देत असत. फिर्यादी सरोजबी भ्र. इरफान मोमीन हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात पती इरफान युसूफ मोमीन, सासू रजिया युसुफ मोमिन आणि सासरा युसुफ ईस्माईल मोमीन यांच्यासह अन्य तीन अशा सहा जणांच्या विरोधात भा.दं.वि. 498 (अ), 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत.

Tagged