atyachar

फोटो स्टुडिओमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे

धारूरमध्ये फोटोग्राफरसह तरुणावर गुन्हा

किल्लेधारूर/सचिन थोरात
दि.१६ : शहरात गजानन शॉपिंग सेंटर येथे असणाऱ्या नृसिंह फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यास गेलेल्या मुलीवर मधुर फरताडे याने अत्याचार केला. आणि घटनेची वाच्यता कोठे केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फोटोग्राफरसह त्याच्या मित्रावर अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला.

शहरातील नृसिंह फोटो स्टुडिओ येथे एक अल्पवयीन मुलगी फोटो काढण्यासाठी आली होती. यावेळी तिच्यावर फोटोग्राफर मधुर फरताडे याने फोटो काढल्यानंतर फोटो घेण्यास दुसऱ्या दिवशी येण्यासाठी बोलावले. मुलगी दुसऱ्या दिवशी फोटो घेऊन जाण्यासाठी आली असता तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध फरताडे याने अत्याचार केला. तसेच, फरताडे याचा मित्र सहदेव चाळक हे दोघे स्टुडिओमध्ये बसले असता ती मुलगी दुसऱ्यावेळी स्टुडिओत आल्यानंतर आरोपी मधुर फरताडे हा फोटो काढण्याच्या निमित्ताने बाहेर गेला……

Advt

त्यावेळी त्याचा मित्र सहदेव चाळकने सदरील मुलीवर अत्याचार केला. तसेच सदरील गोष्टीची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. यावरून फरताडे, चाळक या दोघांविरुद्ध अत्याचार झालेल्या मुलीच्या फिर्यादीवरुन धारूर ठाण्यात कलम ३७६, ५०४ सह पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटनेचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक व्ही.एस.आटोळे करत आहेत.

Tagged