budun mrutyu-panyat budun mrutyu

दोन सख्ख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

राक्षसभुवन शनीचे येथील घटना

गेवराई : आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेहा धर्मराज कोरडे (वय ९) व अमृता धर्मराज कोरडे (वय ८) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच चकलांबा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

Tagged