मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

न्यूज ऑफ द डे बीड

आढावा घेतला; जि.प.च्या नूतन इमारतीची पाहणी

बीड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.27) पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी दिवसभर प्रशासकीय कामकाज पाहिले.

अजित कुंभार यांची आठ दिवसांपूर्वी मुंंबई महानगर पालिकेच्या सहआयुक्त पदी बदली झाली. त्यांच्या जागी पुणे येथून अतिरिक्त जिल्हाधिकारी (जात पडताळणी) अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांनी जिल्हा परिषदेची सुत्रे हाती घेतली. त्याबद्दल विविध पक्ष, संघटनांसह अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी सायंकाळच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम हाळीकर आदी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी इमारतीची माहिती जाणून घेऊन अंतर्गत कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

Tagged