36 लाखांचा गुटखा जप्त!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


पंकज कुमावत यांची कारवाई
बीड दि.4 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षणासाठी काही महिने गेल्यानंतर गुटख्यावरील कारवाया थंडवल्या होत्या. परंतु कुमावत हे हजर झाल्यापासून अवैध धद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत. शनिवारी (दि.4) 36 लाखांचा गुटखा, दोन मोबाईल, ट्रक असा 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने गुटखा माफियांमधे खळबळ उडाली आहे.

गुटख्याने भरलेला ट्रक (जीजे-12 एवाय 9425) बसवकल्याण येथे भरून तो सोलापूर ते बीड रोडने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे. अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. शनिवारी सकाळी चौसाळा ते बीड जाणाऱ्या रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर ट्रक थांबवला. चालक वजीर इम्रानगुल मोहम्मद , सोबत समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये गोवा गुटख्याचे 160 पोते ज्याची किंमत 36 लाख, ट्रक, मोबाईल असा 51 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोह. बालाजी दराडे यांच्या फिर्याद नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, संजय टुले, दिलीप गीते, अनिल मंदे, सचिन अहकारे यांनी केली.

Tagged