ram-nath-kovind

कृषी विधेयकास राष्ट्रपतींची मंजूरी

देश विदेश न्यूज ऑफ द डे शेती

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या 3 कृषी विधेयकांवरून देशभरात विरोध होत असतनाही राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा होईल.

   मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांना ऐतिहासिक निर्णय होत असल्याचे सांगितले होते. या 3 विधेयकांमुळे राजकीय गदारोळ सुरू असतानाच विधेयकांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे आता विधेयकाचं कायद्यात रुपांतर होणार आहे. दरम्यान, देशातील काही राज्यात याविरोधात तीव्र आंदोलने झाली. देशभरातील शेतकरी पक्ष, संघटनांमधून रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात आली होती. मोदी सरकारने संसदेत मंजूरी दिलेल्या तीन कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींनी अंतिम स्वाक्षरी न करण्याची मागणी देशभरातून करण्यात येत आहे. तरी देखील तीन कृषी विधेयकास राष्ट्रपतींची मंजूरी दिली आहे. त्यामुळे हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा होईल. जमीन अधिग्रहण कायद्यावेळी सरकार मागे हटलं होतं, पण यावेळी ती शक्यता नाही, असे बोलले जात आहे.

यासंदर्भात उद्या काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार
विधेयकांवर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरही राज्य शासनाचा विरोध सुरु आहे. उद्या (दि.27) यासंदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही विधेयक राज्यात लागू होऊ देणार नाही असे सांगितले होते.

Tagged