astik-kumar-and-mokshada-pa

औरंगाबादचे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, एसपी मोक्षदा पाटील क्वारंटाइन

न्यूज ऑफ द डे बीड

औरंगाबाद : घरातील कुकला (स्वयंपाकी) कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने येथील महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, त्यांच्या पत्नी औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व सहा वर्षीय मुलगा हे क्वारंटाइन झाले आहेत. त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आस्तिक कुमार पाण्डेय हे त्यांची पत्नी, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या सिडकोतील शासकीय निवासस्थानीच राहतात. त्यांच्या घरी काम करण्यासाठी कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यात स्वयंपाकींचा देखील समावेश आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पाण्डेय यांच्या घरी काम करणार्‍या सगळ्या करमचार्‍यांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्याचे अहवाल प्राप्त झाले. त्यात एका कुकचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या कुकला महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.