बीड पोलीसांनी योग्य तपास केला नसता तर राज्य पेटले असते

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना : बीड पोलीसांचे कौतूक

 बीड :  औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी नुकतीच एका वृतपत्रात मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांना परीक्षेत्रातील कामाच्या अनुभवाबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, बीडमध्ये मराठा आरक्षण प्रकरणी आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले. या प्रकरणामुळे जिल्ह्यासह राज्यभरात वातावरण तपालेले होते. परंतु यामध्ये बीड पोलीसांनी योग्य तपास केला नसता तर राज्य पेटले असते. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केल्यामुळे खरा प्रकार समोर आला.
      बीड तालुक्यातील केतुरा येथे विवेक राहाडे या विद्यार्थ्याने 30 सप्टेंबर रोजी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मराठा आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या केल्याची सुसाईट नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याने मराठा आरक्षणामुळेच आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनीही सांगितले. त्यानंतर या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. त्यानंतर बीड पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी घटनेकडे विशेष लक्ष दिले. योग्य तपास करण्याच्या सुचना बीड ग्रामीण पोलीसांना दिल्या. त्यानंतर सुसाईट नोट व विवेकचे नीट परिक्षा पेपर हस्ताक्षर तज्ञांकडे तपासणीसाठी पाठवले. त्यांच्या अहवालात सुसाईट नोट बनावट असल्याचे समोर आले. 

      विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिार्जुन प्रसन्ना यांना एका मुलाखतीमध्ये परीक्षेत्रातील कामाच्या अनुभवाबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, पदभार घेऊन मला पंधरवडाही लोटला नाही. त्यामुळे या विभागातील जास्त काही अनुभव समोर आला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्यामागचे कारण मराठा आरक्षण न मिळाल्याचे भासवण्यात आले. आत्महत्या करणार्‍या तरुणाच्या नावाने चिट्ठी लिहिली गेली. त्यामुळे बीडसह संपूर्ण राज्यातील वातावरण तापले होते. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा आदेश दिला. बीड पोलीसांनी योग्य तपास केल्यानंतर चिट्ठी आत्महत्या केलेल्या तरुणाची नव्हती. ही बाब समोर आली. बीड पोलीसांनी योग्य तपास केला नसता तर राज्य पेटले असते असेही के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी म्हटले.

Tagged