चारित्र्याच्या संशयावरुन गळा आवळून पत्नीचा खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.11 : चारित्र्याव संशय घेत गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील मासूम कॉलनी येथे शनिवारी (दि.11) रात्री 8 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व इतर कर्मचार्‍यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शेख मलिका शेख याकूब (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांना तीन मुले आहे. परंतु पती शेख याकूब शेख खुतबद्दीन (वय 42 रा.मासुम कॉलनी, बीड) हा सतत मलिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांचा शनिवारी (दि.11) रात्री वाद झाला. यावेळी याकूबने मलिकाचा गळा दाबून तिचा खून केला. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील, पोह.गणेश जगताप आदींनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

आरोपीचे पोलीस ठाण्यात समर्पण
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी कुठेही न जाता थेट पेठ बीड पोलीस ठाण्यात पोहचला. तिथे जावून पोलीसांना पत्नीचा खून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर पेठबीड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Tagged