तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्मलेल्याना सामान्यांचे दुःख काय कळणार – बजरंग सोनवणे

बीड

गेवराई, दि. 18 : मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो त्यामुळे शेतकऱ्याचा पुत्र असल्याने मला सर्वसामान्यांच्या वेदना माहित आहेत. परंतु जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले त्यांना सामान्य शेतकरी शेतमजूर यांचे दुःख कसे समजू शकेल? प्रश्नच माहित नसतील तर त्यांची सोडवणूक होईल का ? असा प्रश्न महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे मतदारांशी संवादादरम्यान कोणाचेही नाव न घेता उपस्थित केला.


यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते बदामराव आबा पंडित , राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे, शिवसेनेचे युवा नेते युद्धजीत दादा पंडित , माजी सभापती पंढरीनाथ लगड हे उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव, बागपिंळगाव कॅम्प, गोपळवस्ती (बेलगांव), बेळगाव, रामनगर तांडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे गावातून मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की ; हे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य आणि रास्त भाव देण्यात अपयशी ठरलेले आहे. या सरकारने निवडणुकी पूर्वी दिलेली आश्वासने देखील पूर्ण केलेली नाहीत . तसेच मराठा आणि ओबीसी बांधवांची आरक्षणाची रास्त मागणी असताना देखील ते हा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत . खा प्रीतम मुंडेंवर आरोप करताना ते म्हणाले कि जिल्ह्यातील असंख्य गावात त्या आल्याच नाहीत असे मतदारच आता सांगत आहेत. आता पर्यंत खासदार कधी गावकऱ्याना दिसल्या नाहीत किंवा गावात आलेल्या नाहीत ? मग त्यांनी सांगत असलेला विकास कुठे झाला ? त्यांचा विकास निधी कुठे गेला ? या प्रश्नांची उत्तरे त्या कधी देणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे म्हणून खऱ्या अर्थाने विकास पाहिजे असेल तर तुतारीधारी माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले
यावेळी अशोक शेंडगे, बाबासाहेब कांबळे, बाबासाहेब सगळे, भीमा टाले, पिंगळे मामा, नामदेव कांबळे, रामप्रसाद राऊत, सखाराम मुगटवार आणि गावकरी सोबत होते.