dr-jitendra-ovhal

अपंग शाळा बंदचे आदेश आल्यानंतरही कोट्यावधींचा निधी वितरीत

बीड

बीड : आयुक्तांनी दिव्यांग बोगस शाळा बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही
समाजकल्याण विभागाने कोट्यावधी रूपयांचा निधी वितरीत केल्याची तक्रार डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील दिव्यांग शाळांची बोगसगिरी समोर आल्यानंतर आयुक्तांनी सदरील शाळा बंदचे आदेश काढले. मात्र सदरील आदेश मार्चमध्ये आल्यानंतरही समाजकल्याण अधिकार्‍यांनी एप्रिल, मे, जुन या महिन्याचा निधी वितरीत केल्याचे डॉ.ओव्हाळ यांनी म्हटले आहे. समाजकल्याण विभागात गेल्या काही महिन्यांपासुन सर्रास सावळा गोंधळ सुरू असुनही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत ? असा सवाल उपस्थित करीत आहे. बंद पडलेल्या शाळांना वेतन, वेतनेत्तर अनुदान व 5% निधी वितरीत करण्यात आला. त्याचबरोबर ऑफलाईन नुतनीकरण असणार्‍या व बिंदु नामवली डावलणार्‍या शाळांनाही अनुदान देण्यात आले. सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून समाजकल्याण अधिकारी येडके यांना तात्काळ बडतर्फ करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा डॉ.ओव्हाळ यांनी आज दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged